शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट अन् देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत टाकला बॉम्ब, म्हणाले...

शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट अन् देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत टाकला बॉम्ब, म्हणाले…

| Updated on: Oct 06, 2023 | 12:18 PM

VIDEO | राज्यातील राजकारणात घडलेल्या 2019 च्या घडामोडींवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने, शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर फडणवीसांनीही पवार यांच्याबद्दल केले 2 गौप्यस्फोट

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याआधी आपल्याकडे आला आणि सरकारमध्ये चला नाही तर जेलमध्ये जावं लागेल, असं सांगितल्याचं शरद पवार म्हणालेत. त्यानंतर फडणवीसांनीही पवार यांच्याबद्दल 2 गौप्यस्फोट केले असल्याचे सांगितले जात आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा 2019 च्या घडामोडींवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस आमने-सामने आलेत. पवार यांच्या एका वक्तव्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणेला घाबरुन अजित पवारांचा गट भाजपसोबत गेला. त्याआधी दादांकडून 8 जण माझ्याकडे येऊन पाठींबा द्या नाही तर जेलमध्ये जावं लागेल असं सांगून गेल्याचा गौप्यस्फोट पवारांनी केला. पण शरद पवारांना तात्काळ फडणवीसांनी प्रत्युत्तर देत, 2019 आणि 2017 मध्ये खुद्द शरद पवार यांनीच आमच्याशी चर्चा केली आणि सोबत येण्यास तयार होते, असं सांगून बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्या वक्तव्यांतर फडणवीसांनीही गौप्यस्फोट केला. 2019 ला सोबत येतो असं सांगून राष्ट्रपती राजवटीची भूमिका पवारांनीच मांडली, असं फडणवीस म्हणाले. बघा स्पेशल रिपोर्ट कोणी काय केले गौप्यस्फोट?

Published on: Oct 06, 2023 12:18 PM