Mohit Kamboj : देशमुख, मलिकांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेते लवकरच जेलमध्ये? मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे खळबळ

| Updated on: Aug 17, 2022 | 8:24 AM

याआधीही मोहित कंबोज यांनी राजकीय भविष्यवाणी केली होती. मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. आतापर्यंत नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्याबद्दल केलेली ही भविष्यवाणी खरी ठरली आहे.

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj Tweet News) यांनी एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचा (Senior NCP Leader) एक बडा नेता लवकरच जेल मध्ये जाईल, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आणखी एक मोठा राष्ट्रवादीचा नेता त्यांनाच भेटेल, असं म्हटलंय. यासोबत सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा टॅग करत त्यांनी हे ट्वीट केलंय. याआधीही मोहित कंबोज यांनी राजकीय भविष्यवाणी केली होती. मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) निकटवर्तीय मानले जातात. आतापर्यंत नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्याबद्दल केलेली ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. आता आणखी एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याबद्दल मोहित कंबोज यांनी केलेल्या सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Published on: Aug 17, 2022 08:24 AM
Special Report | ‘हॅलो’ शब्दावरून महाराष्ट्रात राजकीय वादळ
Video : भगत की कोठी ट्रेनची मालगाडीला मागून धडक! पहाटे 4 वाजता अपघात, एक डबा रुळावरुन घसरला