Special Report | जागा एक, दावे अनेक, 12 लोकसभा जागांच्या 12 भानगडी
VIDEO | जागा एक अन् दावेदार अनेक, सगळ्या पक्षांकडून लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : महाविकास आघाडी फोडून महाराष्ट्रात नव्याने महायुती तयार झालीये. एकीकडे मविआने एकजूट राहण्याचा निश्चिय केलाय. मात्र याच नव्या समीकरणाने अनेक लोकसभा जागांचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण जिथे एकमेकांच्या विरोधात लढले होते. तेच आता एकमेकांना साथ देताना दिसणार आहे. कोणत्या १२ जागांवर दावेदारी सुरू झाल्याचे पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यापैकी नाशिक, धाराशिव, अमरावती, चंद्रपूर, जालना, भिवंडी, कोल्हापूर, हातकणंगले, शिर्डी, शिरूर, पुणे आणि बुलढाणा या जागांवर अनेकांचे दावे सुरूये. या १२ जागावर दावेदारी सुरू झालीय. २०१९ निवडणुका शिवसेना भाजप युती विरूद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत झाली. तर आता शिवसेना भाजपची युती आणि दुसरीकडे शिवसेनेचा दुसरा गट आणि काँग्रेस राष्ट्रवादी आहे. जागा एकच आहे मात्र दावेदार अनेक आहेत यामुळे महाविकास आघाडी सह भाजप शिवसेनेतही रस्सीखेच पाहायाला मिळत आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट