आम्ही नालायक शेतकरी म्हणत कांद्याचं FREE मध्ये वाटप, कांद्याचे दर पडल्याने बळीराजा संतप्त
कांद्याचे दर पडल्याने शेतकरी चांगलाच संतप्त झालाय. एका शेतकऱ्याने मोफत कांदे वाटण्यास सुरूवात केली आहे. या हतबल शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर आमदार जितेंद्र आव्हाड आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय
मुंबई, १९ डिसेंबर २०२३ : कांद्याचे दर पडल्याने शेतकरी चांगलाच संतप्त झालाय. एका शेतकऱ्याने मोफत कांदे वाटण्यास सुरूवात केली आहे. या हतबल शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं की, ‘महाराष्ट्रातल्या कोणत्या तालुक्यातला हा व्हिडिओ आहे माहित नाही, पण राज्यातील शेतक-याचं हे वास्तव आहे. ‘हमीभाव’ तर सोडाच पण त्यांच्या ‘मेहनतीचा पैसा’ही मिळत नाहीए. ‘बळीराजा’च्या नावाने मोठमोठ्या घोषणा करायच्या पण योजना त्यांच्यापर्यंत पोहचतच नसल्याने भ्रष्ट व्यवस्थेत शेतक-यांचाच ‘बळी’ जातोय.’ तर ‘हा व्हिडियो म्हणजे कांदा उत्पादकाने सरकारी कारभाराला आणि राज्यकर्त्यांना दाखवलेला आरसा आहे’, असं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी असे म्हटलंय.
Published on: Dec 19, 2023 06:54 PM
Latest Videos