बळीराजा सुखावला, राज्य सरकारनं घेतला कांदा निर्यात शुल्काबाबतचा मोठा निर्णय
VIDEO | गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडत असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्काचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार कांदा निर्यातीवरील शुल्क रद्द झालंय
नाशिक, २९ ऑक्टोबर २०२३ | केंद्र सरकारने लागू केलेलं कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडत आहेत. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी कांदा ८० रूपयांपर्यंत विकला जात आहे. अशातच कांद्याचे दर वाढणार असल्याची चर्चा होत असताना केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्काचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क रद्द केलं आहे. दरम्यान डिसेंबर अखेर ८०० डॉलर प्रति टन किमान निर्यात शुल्क राहणार आहे असल्याने ज्यांना कांदा निर्यात करायचे आहे त्यांना करता येणार आहे.