अवकाळीचा फटका पिकाला अन् झालेल्या नुकसानानं शेतकऱ्याला अश्रू अनावर

अवकाळीचा फटका पिकाला अन् झालेल्या नुकसानानं शेतकऱ्याला अश्रू अनावर

| Updated on: Apr 10, 2023 | 3:31 PM

VIDEO | वादळ, वारा आणि गारपीटमुळे पिकांचं नुकसान, अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना झोडपलं; कुठं उडाली दाणादाण

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटचा तडाखा राज्यभरातील काही जिल्ह्यांना बसला आहे. छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यातील जेहुर गावातील कांदा उत्पादक शेतकरी दिनकर धनवटे हे अवकाळी पावसामुळे संकटात सापडले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पै-पै जमवून आणि कर्ज काढून हाती आलेले पीक गारपीट आणि वादळी वारा पावसाने नष्ट झाल्याने या शेतकऱ्याला आपले अश्रू अनावर झाले आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा यासारख्या काढणीस आलेल्या पिकांना बसतो. हवामान बदलामुळे द्राक्ष बागांवर मोठ्या प्रमाणात होतो. तर वेलीस लागलेले टॉमेटो, काकडी अवकाळी पावसामुळे गळून पडतात.

Published on: Apr 10, 2023 03:03 PM