Chandrakant Khaire | सत्तारांना युतीवर बोलण्याचा अधिकार नाही, चंद्रकांत खैरेंचा घरचा आहेर
युतीचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील. सत्तार यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांना फटकारले.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीच युतीचा पूल बांधू शकतात असं विधान राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केलं. त्यामुळे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं असतानाच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र अब्दुल सत्तार यांना फटकारलं आहे. युतीचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील. सत्तार यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांना फटकारलं आहे. त्यामुळे युतीच्या मुद्द्यावरून शिवसेनेतच जुंपल्याचं चिन्हं दिसत आहे.
Latest Videos