अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखी चूक करणार नाहीत, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं नेमकं काय सांगितलं?

अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखी चूक करणार नाहीत, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं नेमकं काय सांगितलं?

| Updated on: Apr 18, 2023 | 2:29 PM

VIDEO | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सत्तांतराच्या चर्चा, अजित पवार भाजपमध्ये जाणार? काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं अजित पवारांच्या संभाव्य हलचालींबद्दल केलं भाष्य

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचा गट घेऊन ज्या पद्धतीने बंडखोरी केली, ती चूक आता अजित पवार करणार नाहीत, अशी चर्चा आहे. त्यांनी ती चूक टाळली तरच पुन्हा सत्तापेच उद्भवणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. आता अजित पवार नेमकं काय करू शकतात, यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं भाष्य केलंय. सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात याच मुद्द्यावरून खटला सुरु आहे. कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी लागू शकतो, यात शिदेंसह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. आता अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखी चूक करणार नाहीत, म्हणजे नेमकं काय करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते एवढ्या सहजा सहजी सोडतील, असं वाटत नाही. तर भाजपात विलीन होण्यासारखी नामुष्कीदेखील ओढवून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तिसरा मार्ग काढला जाऊ शकतो. याला ऑपरेशन लोटस असे म्हणता येईल.

Published on: Apr 18, 2023 02:23 PM