Maha Survey : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचं सरकार येणार? महायुती की मविआ?

Maha Survey : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचं सरकार येणार? महायुती की मविआ?

| Updated on: Nov 12, 2024 | 10:08 AM

येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्यापूर्वीच ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार येणार असा दावा करण्यात आलाय. IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE चा ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार, महायुतीला १४५ ते १६५ जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. असे सर्व्हे करून मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळणार असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यापूर्वीही करण्यात आलेल्या इलेक्ट्रोरल एजच्या सर्व्हेनुसार, महाविकास आघाडीचं सरकार येणार असे आकडे आहेत. ज्यामध्ये महायुतीला ११७ जागा तर महाविकास आघाडीला १५७ जागा आणि इतरांना १४ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महायुतीच्या ११७ जागांपैकी भाजपला ७९, शिंदेंच्या शिवसेनेला २३ जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १४ जागा मिळतील असं भाकीत आहे. तर महाविकास आघाडीच्या १५७ जागांपैकी काँग्रेस ६८, शरद पवार गट ४४, उद्धव ठाकरे गट ४१ आणि मित्रपक्ष ०४ जागा दाखवण्यात आल्यात.

Published on: Nov 12, 2024 10:08 AM