पुण्यात पुन्हा मोठा ड्रग्स साठा, अफीम विक्री ठिकाणांचा पोलिसांकडून शोध; कोणत्या भागात झाली कारवाई?
VIDEO | पुणे पोलिसांची मोठी कारवाई, पोलिसांनी छापा टाकून सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 64 लाख 28 हजार रुपये किमतीचे 3 किलो 214 ग्रॅम अफीम पुणे पोलिसांनी केले जप्त, अधिक तपास सुरू
पुणे, २१ ऑगस्ट २०२३ | पुण्यात पुन्हा मोठा ड्रग्स साठा आढळला आहे. पुणे पोलीसांकडून 1 कोटी रुपयांचा आफिम जप्त करण्यात आला असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून 3 जणांना अटक करण्यात आली आहे. राजस्थानची टोळी अफीमचा साठा गोळा करत होती. सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्यातील गोकुळनगर भागात पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी कात्रज भागात पेट्रोलींग करत असताना माहिती मिळाली की, कात्रज-कोंढवा रोडवर एक व्यक्ती अफिम या अंमली पदार्थाची विक्री करत आहेत. पोलिसांनी छापा टाकून सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 64 लाख 28 हजार रुपये किमतीचे 3 किलो 214 ग्रॅम अफीम जप्त केले. अधिक चौकशी केली असता त्याने अफिम हे त्याच्या दोन साथीदार चावंडसिंग राजपूत व लोकेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून आणल्याचे सांगितले. तसेच त्यांनी अंमली पदार्थाचा साठा करुन ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपींकडून 1 कोटी रुपयाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. नेमके हे अमली पदार्थ कुठे विकले जाणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.