मच्छरदानी की मासे पकडायची जाळी? राणांनी वाटलेल्या साड्यांवरून महिला संतप्त, विरोधकांनीही घेरलं
नवनीत राणांनी वाटलेल्या अदिवासी महिलांना वाटलेल्या साड्या मच्छरदानी आणि की मासे पकण्याच्या जाळ्या, असा सवाल मेळघाटातील महिलाच विचारताय. याच सवालावर उत्तर देतांना नवनीत राणांची भंबेरी उडाली. याच मुद्द्यावरून विरोधक नवनीत राणांना चांगलंच घेरताय.
खराब साडी वाटपाचा मुद्दा अमरावती लोकसभेत गाजतोय. त्यात विरोधक यावरून नवनीत राणांवर टीका करताय. त्यातच आज बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांनी घेरलंय. दोन कोटींच्या गाडीत फिरतात आणि साडे 27 रुपयांची साडी वाटताय. नवनीत राणांनी वाटलेल्या अदिवासी महिलांना वाटलेल्या साड्या मच्छरदानी आणि की मासे पकण्याच्या जाळ्या, असा सवाल मेळघाटातील महिलाच विचारताय. याच सवालावर उत्तर देतांना नवनीत राणांची भंबेरी उडाली. याच मुद्द्यावरून विरोधक नवनीत राणांना चांगलंच घेरताय. बच्चू कडू म्हणाले, साडे 17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जत केली गेली. आपण 2 कोटींच्या गाडीत फिरायचं आणि साडे 17 रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची. परंतु ही साडे 17 रूपयांची साडी मतदारांचं मत परिवर्तन करू शकत नाही, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला. बघा स्पेशल रिपोर्ट…