देवेंद्र भुयारांच्या वक्तव्यानं संताप; शेतकऱ्याचं लग्न गाळ, 3 नंबरच्या तर 1 नंबरची मुलगी नोकरीवाल्याला…
अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचं एक वादग्रस्त वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. त्यांचं वक्तव्य सध्या व्हायरल होतंय. यामध्ये त्यांनी महिलांसंदर्भात विधान करून मुलींच्या तीन कॅटगिरी केल्याचे पाहायला मिळाले. तर तिसऱ्या कॅटगिरीतील मुलीच फक्त शेतकऱ्यांच्या मुलाला मिळतात असं देवेंद्र भुयार म्हणाले. यानंतर विरोधकांनी देवेंद्र भुयार यांच्यावर एकच संताप व्यक्त केलाय.
एक नंबरच्या पोरीसाठी नोकरीवाला, दोन नंबरच्या पोरगी पानठेलेवाला आणि किरणा दुकानवाला तर तीन नंबरची मुलगी शेतकऱ्यांच्या मुलाला मिळते. अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी मुलींच्या तीन कॅटगिरी शोधत आपली अक्कल सार्वजनिक केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्यांना भेटत नाही, तर ती नोकरीवाल्या मुलाला भेटते. दोन नंबरची मुलगी कोणाला भेटते, पान टपरी वाल्याला, किराणा दुकानदाराला डोंबरी मुलगी दिली जाते. तर तीन नंबरचा गाळ हेबडली हाबडली पोरगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते.’ पुढे ते असेही म्हणाले, शेतकऱ्याच्या मुलांचं काही खरं राहिलेलं नाही. जन्माला येणारं लेकरूसुद्धा हेबाळ निघतं. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वाणराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे सगळं..”, असं महिलांच्या दिसण्यावरून आमदार देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. भुयारांच्या वक्तव्यानं संताप व्यक्त होत आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट