मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा लगेच सरळ…, अजित पवारांचं विधान वादात
भावकी आणि दमदाटीवरून बारामतीतील राजकारण चांगलंच गाजतंय. अजित पवार जाहीरसभांमधून निधींचं अमिष आणि दमदाटी करत असल्याचा आरोप विरोधक करताय. तर आपण आपल्या समर्थकांना दम देत असून इतरांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? अजित पावारांचा सवाल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर दादागिरीचे तर भाजपकडे दडपशाहीचे आरोप विरोधक करताय. संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर अजित पवारांवर टीका केली. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी ईडीसंदर्भात केलेल्या विधानानंतर गेल्या दीड महिन्यातील कारवाई चर्चेत आल्यात. भावकी आणि दमदाटीवरून बारामतीतील राजकारण चांगलंच गाजतंय. अजित पवार जाहीरसभांमधून निधींचं अमिष आणि दमदाटी करत असल्याचा आरोप विरोधक करताय. तर आपण आपल्या समर्थकांना दम देत असून इतरांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? असा प्रश्न अजित पवारांनी केलाय. मात्र टाटांसारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध उद्योजकांबद्दल अजित पवारांनी जे विधान केलंय ते आता वादात सापडलंय. ‘उद्या जर मोदी सत्तेत असले आणि त्यांना टाटांनी ऐकलं नाही, तर अमित शाह आणि मोदींच्या एका फोननं टाटा सरळ होईल’, असे अजित पवार म्हणाले. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय म्हणाले अजित पवार? विरोधकांची टीका काय?