Special Report | मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा म्हणजे पर्यटन?, विरोधकांचा हल्लाबोल
VIDEO | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांचं टीकास्त्र, बघा स्पेशल रिपोर्ट काय झाली आरोप-प्रत्यारोपांची मालिका
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे फडणवीस यांचा आयोध्या दौरा म्हणजे पर्यटन असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे अयोध्या दौऱ्यावर गेल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांना अयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवला होता, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, राज्यात रावण राज्य चालवून हे अयोध्येला चालले आहेत अशी जहरी टीका केली. यासह संजय राऊतांना महाराष्ट्रातील गारपीट झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला, बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट