भाजप खासदाराची 'लाडक्या बहिणीं'ना दमदाटी अन् महायुती सरकारची कोंडी

भाजप खासदाराची ‘लाडक्या बहिणीं’ना दमदाटी अन् महायुती सरकारची कोंडी

| Updated on: Nov 11, 2024 | 11:01 AM

लाडक्या बहिणींसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी अखेर माफी मागितली आहे. विरोधक आक्रमक झाल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याला चूक ठरवत अशी विधानं न करण्याचे आवाहनच केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची सर्वाधिक भिस्त ही लाडकी बहीण योजनेवर असताना त्यांचेच नेते या योजनेवरून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतायत. यापूर्वीच्या वादग्रस्त वक्तव्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय. धनंजय महाडिक यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी घेरल्यानंतर सत्ताधाऱ्यांना बॅकफूटवर जावं लागलंय. महिलांचं सबलीकरण आणि स्वयंपूर्णतेसाठी आमची लाडकी बहीण योजना असून त्यांना १५०० रूपये देत असल्याचा महायुती सरकाने दावा केला आहे. मात्र फक्त निवडणुकीसाठी आणि मतांसाठी लाडकी बहीण आठवली असे म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केलाय. तर विरोधकांचा हाच आरोप आतापर्यंत शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे, भाजपचे आमदार टेकचंद सावरकर, भाजप समर्थक आमदार रवी राणा, भाजपचे खासदार धनंजय महाडिकांनी खरा ठरवण्याचं काम केलंय. बघा स्पेशल रिपोर्ट कोणी काय केलं वक्तव्य?

Published on: Nov 11, 2024 11:01 AM