‘इंडिया’च्या बैठकीआधीच शरद पवार-उद्धव ठाकरे जोशात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय दिला इशारा?
Tv9 Special Report | विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक, 'इंडिया' आघाडीचा रोडमॅप काय? उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला थेट इशारा, म्हणाले...
मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ | विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक उद्या मुंबईत होत आहे. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीपूर्वीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे. ताणाशाही विरोधात आम्ही एकत्र आल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ललकारले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांनी चॅलेंज दिलंय. राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप करण्याऐवजी त्याची चौकशी करून सत्यता समोर आणा, असे आव्हान शरद पवार यांनी दिलंय. अजित पवार यांचा गट भाजपसोबत येण्याच्या आठ दिवस आधी मोदी यांनी राष्ट्रवादीवर ७० कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला होता. पंतप्रधान मोदी यांना आव्हान देत शरद पवार यांनी अजित पवार यांनी इशारा दिलाय. जनतेत संभ्रम नसून जनता अजित पवार गटाला धडा शिकवतील असे शरद पवार म्हणालेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…