मुंबईत बैठक विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची, चर्चा शिंदेंचं बंड आणि गुवाहाटीची..!

मुंबईत बैठक विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची, चर्चा शिंदेंचं बंड आणि गुवाहाटीची..!

| Updated on: Sep 01, 2023 | 1:10 AM

VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीच्या खर्चावर बोट, काय केला मंत्री उदय सामंत यांनी थेट आरोप, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३ | इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देशभरातून विविध नेते दाखल झाले आहेत. ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये त्यांचं जंगी स्वागतही केलंय. या बैठकीपूर्वी संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून मोठ वक्तव्य केलय. तर या बैठकीच्या खर्चावरून शिंदे यांच्या शिवसेनेनं सवाल केलेत. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुरत आणि गुवाहाटीचा खर्च काढलाय. २८ पक्षांचे बडे चेहेरे राजधानीत दाखल झालेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इंडिया आघाडीचा प्लॅन तयार असेल. राहुल गांधी आणि सोनिया गांधी विमानतळावर येताच त्यांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. तर इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असा सवाल केला जात असताना राहुल गांधी तर नाही ना? असा प्रश्न केला जात आहे. दरम्यान, मुंबईत विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होत असताना चर्चा मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आणि गुवाहाटीची होताना दिसली बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 01, 2023 01:10 AM