विकासकामं सोडून शिंदे सरकारकडून इतर गोष्टींवर उधळपट्टी, अजित पवार यांनी मांडला हिशोब; बघा व्हिडीओ

विकासकामं सोडून शिंदे सरकारकडून इतर गोष्टींवर उधळपट्टी, अजित पवार यांनी मांडला हिशोब; बघा व्हिडीओ

| Updated on: Feb 26, 2023 | 7:19 PM

VIDEO | उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाबाबत बोलताना अजित पवार यांचा शिंदे- फडणवीस सरकारवर साधला निशाणा, बघा काय केली टीका?

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत. हे सरकार तिथे लक्ष देण्यास कमी पडले आहे. जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च केला जातो तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या निधीचे वितरण झालेले नाही. आर्थिक वर्ष संपत असल्याने हा निधी परत जाणार आहे, असे म्हणत अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर ही उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्याच्या वर्षावर जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रूपये, आमचे काही सहकारी देखील मुख्यमंत्री होते, मीही उपमुख्यमंत्री होतो. चार महिन्यात जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख एवढं बील कसं काय? चहामध्ये सोन्याचे पाणी घातले का? असा सवाल करत त्यांनी टोला लगावला.

Published on: Feb 26, 2023 07:15 PM