अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे टोचले कान; म्हणाले, मेहनत केली तर...

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे टोचले कान; म्हणाले, मेहनत केली तर…

| Updated on: Feb 10, 2023 | 8:35 AM

अजित पवार यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना पाजले उपदेशांचे डोस, काय म्हणाले अजितदादा पवार?

मुंबई –  मेहनत केली तर निकाल आपल्याच बाजूने लागणार, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. उद्याच्या निवडणुकीवर आजच्या पोटनिवडणुकीचा परिणाम होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तिकीट मिळाले नाही आणि बोलावले नाही असे करू नका, असे म्हणत अजित पवार यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणे झाले असून तुम्ही तरूण नेतृत्व असून तुम्हाला वेळ द्यावा लागेल. काँग्रेसचे नेते मंडळी त्यांच्या पद्धतीने वेळ देतील, पण उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला कमी पडायचे नाही, असे अजित पवार म्हणाले.

Published on: Feb 10, 2023 08:33 AM