राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा, कुणी केली जिव्हारी लागणारी टीका?
ज्या पक्षाचा एक उमेदवार नाही, तो पक्ष गावोगावी आणि घरोघरी जाऊन प्रचार करतोय. सुपारी घेण्याचे प्रकार किती उच्च स्तराचे असतात हे राज ठाकरेवरून दिसत असल्याचे म्हणत राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या शिवतीर्थावरील सभेवर ठाकरे गटाच्या नेत्याची सडकून टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा आहे. ज्या पक्षाचा एक उमेदवार नाही, तो पक्ष गावोगावी आणि घरोघरी जाऊन प्रचार करतोय. सुपारी घेण्याचे प्रकार किती उच्च स्तराचे असतात हे राज ठाकरेवरून दिसत असल्याचे म्हणत ठकारे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर मोदींवर भाष्य करताना दानवे म्हणाले, येत्या काळात नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला देखील येतील, असा खोचक टोलाही मोदींना लगावला. यासह देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंची भाषा घसरत चाललीये. ते दिल्लीचा प्रचार करताय की गल्लीचा हे कळत नाहीये, अशी टीका केली होती. यावर अंबादास दावने यांनी प्रत्युत्तर दिलंय. आधी तुमचे चमचे, काटे कसे बोलतात हे बघा… तुमचे पंतप्रधान उद्धव ठाकरेंना नकली म्हणतात. तुमची कोणती भाषा आहे? असे म्हणत त्यांनी प्रतिसवाल केलाय.