‘राज्यात शेतकरी दुःखात अन् एकनाथ शिंदे यांचा मात्र हेलिकॉप्टरने अयोध्या दौरा’, मुख्यमंत्र्यावर विरोधकांचे टीकास्त्र
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला ठाकरे गट अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात दौरा करून उत्तर देण्याच्या तयारी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदार खासदार आणि मंत्र्यांचा आयोजित दाखल झाले आहेत यावेळी त्यांनी आयोध्यातील राम लल्लाचा दर्शनही घेतले हा फक्त शिवसेनेचा अयोध्या दौरा असल्याचे सांगत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येत दाखल झाले. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला ठाकरे गट अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भागात दौरा करून उत्तर देण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यभरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. अचानक झालेला अस्मानी संकट आणि शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावून घेतले याच पार्श्वभूमीवर ठाकरे राज्यभर नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार आहे. दरम्यान, रामराज्य म्हणजे रयतेचे राज्य. जर रयतच सुखी नसेल तर काय कामाचे. शेतकरी दु:खात असताना मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने अयोध्या दौरा करतायेत पण खरा देव तो या शेतकऱ्यांमध्ये असल्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या अयोध्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.