मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा यांच्यात कोल्ड वॉर?, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट?

मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा यांच्यात कोल्ड वॉर?, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट?

| Updated on: Aug 11, 2023 | 4:49 PM

VIDEO | 'कोल्ड वॉर कुठल्या दिशेने गेलाय हे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहिलं असेल अन् मलिदा खायचं असेल तर मिळून खातात, पण जनतेच्या प्रश्नासाठी यांच्याकडे वेळ नाही', विजय वडेट्टीवार यांनी काय केला हल्लाबोल

नागपूर, ११ ऑगस्ट २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. इतकेच नाही तर अजितदादा शिंदे सरकारमध्ये सामील झाले असून त्यांनी पुन्हा एकदा शिंदे यांच्या खात्यात ढवळाढवळ सुरू केली आहे. खुद्द राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्याचा गौप्यस्फोट केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वॉर रूममध्ये राज्यातील प्रोजेक्टचा आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. त्याचा फायनान्स विभागाचा काही संबंध नसतो. म्हणजे वॉररूममध्ये कोल्डवार सुरू झाला आहे. तो कोल्ड वॉर कुठल्या दिशेने गेलाय हे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहिलं असेल, असा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Published on: Aug 11, 2023 04:46 PM