ऐन थंडीत सरकारला घामटा फुटणार?, वडेट्टीवार यांच्या घरी विरोधकांची खलबतं; नेमकं काय शिजतंय?

ऐन थंडीत सरकारला घामटा फुटणार?, वडेट्टीवार यांच्या घरी विरोधकांची खलबतं; नेमकं काय शिजतंय?

| Updated on: Dec 07, 2023 | 6:35 PM

या बैठकीतून नेमकं काय ठरवलं जाणार? विरोधकांकडून कुठली रणनीती आखली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनातील पुढील दिवसात विरोधक सरकारला घेरणार असल्याची शक्यता

नागपूर, ७ डिसेंबर २०२३ : आजपासून राज्यविधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालं असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधीमंडळाचा परिसर दणाणून सोडला. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. अशातच हिवाळी अधिवेशनातील पुढील रणनीतीबाबत विरोधकांची बैठक सुरू आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी विरोधी पक्षनेत्यांची बैठक होत असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्यासह इतर विरोधी नेते मंडळी उपस्थित आहे. राज्यात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातील पुढील रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होत आहे आणि याच बैठकीमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या घरी विरोधी पक्षनेत्यांची बैठक सुरू असून मोठी रणनीती ठरवली जात आहे. तर या बैठकीतून नेमकं काय ठरवलं जाणार? विरोधकांकडून कुठली रणनीती आखली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनातील पुढील दिवसात विरोधक सरकारला घेरणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Published on: Dec 07, 2023 06:35 PM