Devendra Fadnavis | हे सरकार जुलमी आणि वसुली सरकार, देवेंद्र फडणवीसांचे आरोप
भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपने थेट विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. (opposition mlas hold parallel assembly in maharashtra assembly premises)
काल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपने थेट विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर चर्चा सुरू झाली. विधानसभेचा पहिला दिवस आमदारांच्या निलंबनावरून गाजला. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विरोधक सभागृहात उपस्थित राहून गोंधळ घालतील असे संकेत होते. मात्र, भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे
Latest Videos