आरक्षणासाठी मोर्चा अन् आरोपांचीच चर्चा, कुणामागे कोण? कोण कुणाचं खातंय यावरुन वादांची मालिका

आरक्षणासाठी मोर्चा अन् आरोपांचीच चर्चा, कुणामागे कोण? कोण कुणाचं खातंय यावरुन वादांची मालिका

| Updated on: Oct 16, 2023 | 12:21 PM

tv9 Marathi Special Report | आरक्षणाचे मोर्चे आताच कसे निघताय? असा सवाल करत सदाभाऊ खोत यांचा मोर्च्याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह, तर हे फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी सुरू असल्याचा सदाभाऊ खोत यांचा आरोप... सदाभाऊ खोत यांनी केलेल्या आरोपांवर आता विरोधकांकडून हल्लाबोल

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | आरक्षणाचे मोर्चे आताच कसे निघताय? असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी मोर्च्याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी सुरू असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या आरोप आता विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जातोय. तर दुसरा दावा म्हणजे आरक्षणाच्या माध्यमातून राज्यात जातीचं राजकारण होतंय. विरोधाभास म्हणजे सदाभाऊ खोत हे सत्ताधाऱ्यांचे समर्थक आहेत तर काही आरक्षणाचे लढे हे सत्ताधारी नेत्यांनी सुरू केलेत. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या दाव्यामुळे सरकारमधील नेत्यांवरच प्रश्न उभे केलेत. दुसरा विरोधाभास म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिलंय. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी मराठ्यांच्या मोर्च्यात सहभागी होत्या तर दुसरीकडे मंत्री विखे-पाटील जरांगे पाटील यांच्या मागणीला चूक ठरवताय.

Published on: Oct 16, 2023 12:21 PM