बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला अद्याप विरोध कायम, भीम आर्मीकडून दाखवले काळे झेंडे

बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला अद्याप विरोध कायम, भीम आर्मीकडून दाखवले काळे झेंडे

| Updated on: Nov 21, 2023 | 1:01 PM

पुण्यातील बागेश्वरबाबाच्या कार्यक्रमाला विरोध अद्याप कायम आहे. भीम आर्मीने काळे झेंडे दाखवत या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आधीपासूनच वादात अताना चंद्रकांत पाटील यांनी बागेश्वर बाबाची घेतली भेट

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : पुण्यातील बागेश्वरबाबाच्या कार्यक्रमाला विरोध अद्याप कायम आहे. भीम आर्मीने काळे झेंडे दाखवत या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आधीपासूनच वादात आहे. यादरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी बागेश्वर बाबाची भेट घेतली. तर सरकारमधील अन्य काही नेते त्यांच्या भेटीला जाणार आहेत, अशी माहिती आहे. संत तुकाराम महाराज, साईबाबा यांच्यावर केलेली टीका आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे आरोप बागेश्वर बाबांवर आहे. तर बागेश्वर बाबा जो प्रेत दरबार भरवतात त्यावर अंनिसचा आक्षेप आहे, दाव्याप्रमाणे ज्यांच्या अंगात येतं त्यांना या दरबारात ठीक केलं जातं, असं म्हटलं जातं. मात्र राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू असल्याने बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला अंनिस विरोध करत आलीये. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 21, 2023 01:01 PM