नाशिकच्या जागेवरून हंगामा, भाजप-शिंदे गट आमने सामने; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे पुन्हा उभे राहिले तर ते पराभूत होणार, असा थेट इशाराच भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांनी दिलाय. हा वाद देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यापर्यंत पोहोचला तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर शिंदेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंचं शक्तिप्रदर्शन
नाशिकच्या जागेवारून महायुतीतील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आलाय. शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे पुन्हा उभे राहिले तर ते पराभूत होणार, असा थेट इशाराच भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांनी दिलाय. हा वाद देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यापर्यंत पोहोचला. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर शिंदेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी शक्तिप्रदर्शन केलं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर देवयानी फरांदे, सीमा हिरे हे आमदार आणि इच्छुक उमेदवार दिनकर पाटील आलेत. नाशकात भाजपची ताकद जास्त असून भाजपचाच उमेदवार द्यावा, अशी मागणी नाशिकच्या भाजपच्या लोकप्रतिनिधींची आहे. नाशिकच्या जागेवरून खासदार हेमंत गोडसे आणि इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांच्यातील वाद टोकाला पोहोचलाय. दिनकर पाटील यांनी हल्लाबोल करत दिनकर पाटील यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत.