Rain Update | ठाणे, पालघरला 23 जुलैपर्यत ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागानं आजच्यासाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागानं आजच्यासाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
22 जुलै रोजी पावसाचा अंदाज काय?
सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
23जुलै रोजी पावसाचा अंदाज काय?
सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, चंद्रपूर, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.