गद्दारी करणाऱ्यांना… ओमराजे निंबाळकरांचा शिंदेंच्या शिवसेनेतील खासदारावर हल्लाबोल
ज्यांनी गद्दारी केली जे शिंदे साहेबांसोबत गेले त्या खासदारांना हेलपाटे मारून देखील लोकसभेची उमेदवारी मिळवता आली नाही', अशा शब्दात ओम राजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटातील उमेदवारी डावलण्यात आलेल्या खासदारावर टीका केली आहे. ओमराजे निंबाळकर हे आज रोहित पवार, आदित्य ठाकरे आणि अमित देशमुख यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार
उस्मानाबाद लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ‘मी उद्धव ठाकरे व मातोश्री यांच्यासोबत एक निष्ठेने राहिलो याचेच फळ म्हणून मला दुसऱ्यांदा खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे. ज्यांनी गद्दारी केली जे शिंदे साहेबांसोबत गेले त्या खासदारांना हेलपाटे मारून देखील लोकसभेची उमेदवारी मिळवता आली नाही’, अशा शब्दात ओम राजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटातील उमेदवारी डावलण्यात आलेल्या खासदारावर टीका केली आहे. तर मी केलेल्या विकास कामाबाबत चर्चा करायची असेल तर पाटील कुटुंबातील सदस्यांनी एका व्यासपीठावर यावं आणि माझ्या पाच वर्षाचा आलेख, तुमच्या 40 वर्षाचा हिशोब जनतेला द्यावा, असे आव्हान ओमराजे निंबाळकर यांनी पाटील कुटुंबीयांना दिले आहे. तसेच उमेदवार अर्चना पाटील आपल्या केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आल्या असून स्थानिक पत्रकारांना त्या मुलाखती देत नाहीत तर वृत्तसंस्थामार्फत मुलाखती देत पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान ओमराजे निंबाळकर हे आज रोहित पवार, आदित्य ठाकरे आणि अमित देशमुख यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.