Osmanabad Rescue | उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू
उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तेरणा नदीला आलेल्या पुरांमुळे नागरिक अडकले असून त्यांना सोडवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात तेर ढोकी या भागात ढगफुटी झाली आहे. नदी नाले तुडुंब वाहत असून तेरणा नदीला पूर आला आहे. तेरणा धरण फुल्ल झाले असून सर्व दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे तेर या गावासह तेरणा नदी काठी असलेल्या इर्ला दाऊतपूर येथे पाणी गावात शिरले आहे.
तेरणा धरण भरले असून या धरणातुन वाहणारे पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत, तेरणा या धरणची व आसपासच्या गावात पावसाने पाणीच पाणी झाले असून नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
Latest Videos