“हे अडीच वर्ष सोडून पुढेही आमचंच सरकार”; एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
शिंदे-भाजपचं बेकायदेशीर सरकार कोसळणार असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. लाज असेल राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा, असं आव्हानसुद्धा आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे.
शिंदे-भाजपचं बेकायदेशीर सरकार कोसळणार असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. लाज असेल राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा, असं आव्हानसुद्धा आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे. “आमचं सरकार कायदेशीर आणि बहुमताचं होतं. हे अडीच वर्ष सोडून पुढेही आमचंच सरकार असेल”, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे. “त्यांना स्वत:चं समाधान करून घ्यायचं असेल तर घेऊ द्या. आम्ही घटनेनुसार आणि कायदेशीर सरकार स्थापन केलं आहे. हा अडीच वर्षांचा कार्यकाळ हे सरकार पूर्ण करेलच. पण पुढच्या निवडणुकीतदेखील हेच सरकार जिंकेल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Published on: Jul 21, 2022 04:56 PM
Latest Videos