Special Report | उत्तर महाराष्ट्राशी दुजाभाव झाला का?
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाची माळ ज्या ज्या जिल्ह्यांना मिळाली त्यांनी ती संधी कधीच सोडली नाही. म्हणूनच म्हटले जाते की, महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातूनच फक्त मुख्यमंत्री पदाची माळ सगळ्यात जास्त वेळा त्यात्या व्यक्तींच्या गळ्यात पडले.
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाची माळ ज्या ज्या जिल्ह्यांना मिळाली त्यांनी ती संधी कधीच सोडली नाही. म्हणूनच म्हटले जाते की, महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातूनच फक्त मुख्यमंत्री पदाची माळ सगळ्यात जास्त वेळा त्यात्या व्यक्तींच्या गळ्यात पडले. महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचे नेतृत्व करण्याची संधीही फक्त सात जिल्ह्यांनाच मिळाली आहे. तर उत्तर महाराष्ट्र मात्र या संधीपासून कायम वंचित राहिलेला प्रदेश आहे. प्रादेशिक भागात खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राला एकदाही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत टिकून राहता आले नाही. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ या प्रादेशिक भागांना मुख्यमंत्री पदाची माळ घालण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे, मात्र उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पद मिळालं नाही. त्यातच मुंबई आणि कोकणला दहा वर्षे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर विदर्भाला सगळ्यात जास्त वेळा मुख्यमंत्री पद मिळाले आहे.