राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभेत १४ मतदारसंघात लढणार? मनसेचे 'हे' १४ उमेदवार ठरले?

राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभेत १४ मतदारसंघात लढणार? मनसेचे ‘हे’ १४ उमेदवार ठरले?

| Updated on: Jan 07, 2024 | 11:53 AM

लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी १४ जागांवर उमेदवार देण्याची मनसेनं तयारी केली असल्याचे दिसतंय. गेल्या महिन्यात १८ तारखेला राज ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाबाबत मुंबईत आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर आता १४ उमेदवारांची नावं समोर आली आहेत.

मुंबई, ७ जानेवारी २०२४ : महायुती आणि महाविकास आघाडीची जागा वाटपावरून खलबतं सुरू आहेत. त्याचवेळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १४ उमेदवार निश्चित केले आहेत, अशी चर्चा आहेत. लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी १४ जागांवर उमेदवार देण्याची मनसेनं तयारी केली असल्याचे दिसतंय. गेल्या महिन्यात १८ तारखेला राज ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाबाबत मुंबईत आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर आता १४ उमेदवारांची नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये कल्याणमधून राजू पाटील, ठाण्यातून अभिजीत पानसे, द.मुंबईतून बाळा नांदगावकर, द. मध्यमुंबईतून नितीन सरदेसाई, ई.मुंबईतून संदीप देशपांडे, उ. मुंबईतून संजय तुर्डे आणि गजानन राणे, उ. पश्चिम मुंबई वागीश सारस्वत, बारामतीतून सुधीर पाटस्कर, पुण्यातून वसंत मोरे की साईनाथ बाबर? रायगडमधून वैभव खेडेकर, सोलापूर येथून दिलीप धोत्रे, चंद्रपुरातून राजू उंबरकर आणि नाशिकमधून डॉक्टर प्रदीप पवार हे लोकसभेच्या १४ मतदारसंघातील संभाव्य उमेदवार असल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Jan 07, 2024 11:53 AM