ठाकरेंच्या 13 आमदारांपैकी किती आमदार अन् खासदार संपर्कात? उदय सामंतांनी थेट आकडाच सांगितला
उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले त्यानंतर त्यांनी कोकणच्या जनतेसाठी काय करणार हे सांगणं अपेक्षित होतं. रिफायनरीला विरोध करून त्यांनी मत घेण्याचा प्रयत्न केलाय. असे सांगत असताना उद्धव ठाकरेंच्या तेरा आमदारांपैकी पाच सहा आमदार आणि किती खासदार शिंदेंच्या संपर्कात याचा आकडाच सांगितला.
महायुती भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीमध्ये प्रभागनिहाय सभा झाल्यात. प्रत्येक सभेला हजारोंच्या संख्येने मतदार उपस्थित होते. त्यामुळे या मतदारसंघाने ठरवलंय की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोडीचं मताधिक्य रत्नागिरी जिल्हा नक्की देईल आणि नारायण राणे यांना लोकसभेत नक्की पाठवू असा विश्वास या सगळ्या सभांमधून मिळत असल्याचे शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटले. तर या विरोधात एक कॉर्नर सभा झाली. या सभेचं चित्र पाहिलं तर रत्नागिरीत आल्यानंतर कोकणच्या विकासासाठी आपण काय करणार या मुद्द्यावर सभा अपेक्षित होती, मात्र तसं झालं नाही, असे उदय सामंत म्हणाले. उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले त्यानंतर त्यांनी कोकणच्या जनतेसाठी काय करणार हे सांगणं अपेक्षित होतं. रिफायनरीला विरोध करून त्यांनी मत घेण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणी पत्र लिहिलं होतं? पाच वर्षांपूर्वी हेच लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. पण आता त्यांनी विरोध केला असला तरी देशातील जनता मोदींसोबत असल्याचे उदय सामंत म्हणाले. तर उद्धव ठाकरेंच्या तेरा आमदारांपैकी पाच सहा आमदार आणि दोन-तीन खासदार सुद्धा शिंदेंच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.