Corona Update | राज्यात आजही कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक, 46 हजार 406 नवे कोरोना रुग्ण-TV9

Corona Update | राज्यात आजही कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक, 46 हजार 406 नवे कोरोना रुग्ण-TV9

| Updated on: Jan 13, 2022 | 10:04 PM

राज्यात आजही कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे, आज राज्यात 46 हजार 406 रुग्ण आढळून आहेत, तर कोरोनामुळे 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतला आकडा काहीसा घसल्याने मुंबईला थोडा दिलासा मिळताना दिसून येत आहे.

राज्यात आजही कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे, आज राज्यात 46 हजार 406 रुग्ण आढळून आहेत, तर कोरोनामुळे 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतला आकडा काहीसा घसल्याने मुंबईला थोडा दिलासा मिळताना दिसून येत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सर्व राज्यांच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडून पंतप्रधान मोदींकडे महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींची मागणी केल्याचंही टोपे यांनी सांगितलं. लसीकरणाबाबत जो काही राष्ट्रीय कार्यक्रम सुरु आहे. त्यात आपण कोव्हॅक्सिन लसीचे 40 लाख डोस आणि कोविशिल्ड लसीचे 50 लाथ डोस मागितले आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत आहे, त्यामुळे केंद्राकडे वाढीव लसीच्या पुरवठ्याची मागणी केल्याचं टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Published on: Jan 13, 2022 10:03 PM