Special Report | पुलाच्या उद्धाटनात महाविकास आघाडीची ‘कोंडी’-TV9
थेट वरिष्ठ नेत्यांनीच एकमेकांवर टीकास्त्र सोडल्याने त्याचा ठाण्यातील आघाडीवरही परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आपलं मत आघाडीच्या बाजूने नसल्याचं सांगत थेट एकला चलो रेचा नारा दिला आहे. तर, आघाडी होणारच असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे: ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील रंगलेला कलगीतुरा काही थांबताना दिसत नाही. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी त्यावर पलटवार केला आहे. 2014 नंतर खारीगाव रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन बदलले असले तरी खासदार शिंदे यांचे श्रेय राष्ट्रवादी घेऊ इच्छित नाही. पण, त्यांनी बोलताना भान ठेवले पाहिजे. मराठीत एक म्हण आहे, बापाची चप्पल मुलाच्या पायात आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही. आव्हाड हे मुलासमान प्रेम करतात; पण, मुलाच्या यशाने पोटदुखी होईल, अशी राष्ट्रवादीची भावना नाही, अशा शब्दात आनंद परांजपे यांनी श्रीकांत शिंदे यांना चपराक लगावली आहे. थेट वरिष्ठ नेत्यांनीच एकमेकांवर टीकास्त्र सोडल्याने त्याचा ठाण्यातील आघाडीवरही परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आपलं मत आघाडीच्या बाजूने नसल्याचं सांगत थेट एकला चलो रेचा नारा दिला आहे. तर, आघाडी होणारच असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.