OBC आरक्षणाच्या विषयावर छगन भुजबळ मागची अडीच वर्ष झोपले होते - चंद्रशेखर बावनकुळे

OBC आरक्षणाच्या विषयावर छगन भुजबळ मागची अडीच वर्ष झोपले होते – चंद्रशेखर बावनकुळे

| Updated on: Jul 16, 2022 | 12:26 PM

"ओबीसी आरक्षणासाठी मागची अडीच वर्ष विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ झोपले होते. 019 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, तात्काळ इम्पेरिकल डेटा तयार करुन ओबीसींना आरक्षण द्या"

मुंबई: “ओबीसी आरक्षणासाठी मागची अडीच वर्ष विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ झोपले होते. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, तात्काळ इम्पेरिकल डेटा तयार करुन ओबीसींना आरक्षण द्या, सुप्रीम कोर्टाला अहवाल कळवा असं सांगितलं. पण दोन वर्ष काहीच केलं नाही. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा सांगितलं की, ओबीसींना आरक्षण द्या. पण छगन भुजबळांनी समता परिषदेचे मोर्चे काढले फक्त. पण अडीच वर्ष ओबीसींना न्याय देण्यासाठी कुठलीच कारवाई केली नाही” अशा शब्दात भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीक केली.

Published on: Jul 16, 2022 12:26 PM