जळगावच्या प्रसिद्ध ज्वेलर्सवर ईडीची छापेमारी का? बघा काय म्हणाले राजमल लखीचंदचे मालक?

जळगावच्या प्रसिद्ध ज्वेलर्सवर ईडीची छापेमारी का? बघा काय म्हणाले राजमल लखीचंदचे मालक?

| Updated on: Aug 18, 2023 | 9:08 PM

VIDEO | राजमल लखीचंद ज्वेलर्सवर आज ईडीची छापेमारी अन् एकच खळबळ उडाली. ईडीकडून नेमकी कारवाई का करण्यात आली, याविषयी राजमल लखीचंद ज्वेलर्स ग्रुपचे मालक ईश्वरलाल जैन यांची प्रतिक्रिया

जळगाव, १८ ऑगस्ट २०२३ | जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार आणि माजी खासदार ईश्वर लाल जैन यांच्या सहा कंपन्यांवर मुंबई, नाशिकसह अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत खळबळ उडाली आहे. ईडीकडून नेमकी कारवाई का करण्यात आली, याविषयी राजमल लखीचंद ज्वेलर्स ग्रुपचे मालक ईश्वरलाल जैन यांनी प्रतिक्रिया दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी असल्याने कारवाई झाली का? असा प्रश्न पत्रकारांनी जैन यांना विचारल्यानंतर माझे आणि शरद पवारांचे अनेक वर्षांपासून संबंध आहे. तर “राजकीय दबावातून ही कारवाई झाली, असे मी म्हणणार नाही. शरद पवारांशी अनेक वर्षांपासून संबंध आहेत. मी आजही त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच पाठीशी राहणार आहे. ईडीने तपासा दरम्यान दागिने, रोकड सील करण्याची जी कारवाई केली ती कायदेशीररित्या चुकीचीच आहे. माझ्या नातवांच्या फर्मचा कुठलाही संबंध नसताना, त्यांचीही रोकड तसेच मुद्देमाल सील केली”, अशी प्रतिक्रिया ईश्वरलाल जैन यांनी दिली.

Published on: Aug 18, 2023 08:56 PM