तिरुमला कंपनीवर छापे अन् कुटेंच्या भाजप प्रवेशावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल काय?

| Updated on: Nov 12, 2023 | 9:08 AM

तिरूमल्ला उद्योग समुहाचे सर्वेसर्वा कुटेंचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. गेल्या एका महिन्यांपूर्वी त्यांच्या उद्योग समुहावर आयकर विभागाने छापे पडले होते. त्यानंतर ३० दिवसांतच त्याचा भाजप प्रवेश झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली. बावनकुळेंनी त्यांचं भाजपमध्ये स्वागत केलं. यावरूनच विरोधकांची टीका

Follow us on

मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | तिरूमल्ला उद्योग समुहाचे सर्वेसर्वा कुटे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. गेल्या एका महिन्यांपूर्वी त्यांच्या उद्योग समुहावर आयकर विभागाने छापे पडले होते. त्यानंतर ३० दिवसांतच त्याचा भाजप प्रवेश झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली. कुटे उद्योग समुह घराघरात परिचित आहे. बीड सारख्या शहरातून सुरू झालेला तिरूमल्ला नावाने ओळखला जाणारा उद्योग अनेक राज्यात विस्तारलाय. मात्र जो घटनाक्रम घडलाय. त्यावरून विरोधकांनी भाजपला टार्गेट केलंय. ११ ऑक्टोबर रोजी कुटे उद्योग समुहावर आयकरचं धाडसत्र पाहायला मिळाले. त्याच्या बरोबर १ महिन्यांनी कुटे उद्योग समुहाच्या प्रमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं भाजपमध्ये स्वागत केलं. यावरूनच विरोधक भाजपवर दबाव तंत्राचा आरोप करताय. बघा स्पेशल रिपोर्ट