अयोध्येत रामनामाची शपथ अन् रामेश्वरमच्या दिशेने प्रवास, शिप्राची पदयात्रा नागपुरात दाखल

अयोध्येत रामनामाची शपथ अन् रामेश्वरमच्या दिशेने प्रवास, शिप्राची पदयात्रा नागपुरात दाखल

| Updated on: Jan 11, 2024 | 11:01 PM

जलस्त्री शिप्रा पाठक राम जानकी जंगलाच्या वाटेवर चालत रामेश्वरमच्या मार्गाने प्रवास करत आहे. आज नागपूरमार्गे त्या वर्धा शहरात जातील, त्यानंतर नाशिक, हुबळी मार्गे रामेश्वरमला पोहचतील. सुमारे ४ हजार किलो मीटरची यात्रा असून मार्च महिन्यात रामेश्वरम येथे जलाभिषेक करणार आहेत.

नागपूर, ११ जानेवारी २०२४ : राम जानकी नावाने प्रतिज्ञा घेऊन अयोध्येतून निघालेली शिप्राची पदयात्रा नागपुरात दाखल झाली आहे. जलस्त्री शिप्रा पाठक राम जानकी जंगलाच्या वाटेवर चालत रामेश्वरमच्या मार्गाने प्रवास करत आहे. आज नागपूरमार्गे त्या वर्धा शहरात जातील, त्यानंतर नाशिक, हुबळी मार्गे रामेश्वरमला पोहचतील. सुमारे ४ हजार किलो मीटरची यात्रा असून मार्च महिन्यात रामेश्वरम येथे जलाभिषेक करणार आहेत. येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या भव्य रामल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे २७ नोव्हेंबरला रामनगरी अयोध्येतून रामनामाची शपथ घेऊन जलमहिला शिप्राच्या राम जानकी वन गमन पद यात्रा सुरू केली होती. सुमारे दीड महिने पायी प्रवास करत ही यात्रा नागपूरात पोहोचली आहे. महाराष्ट्रात प्रवेश करताच त्यांनी रामटेक सिद्ध ठिकाणी ध्यान केले. जेथे प्रभू राम जानकीजी त्यांच्या वनवास काळात राहिले होते. भारतात या प्रवासाला सरयू ते सागर असेही म्हणतात.  शिप्रा पाठक राम जानकी वन गमन मार्गावर ठिकठिकाणी राम जानकी अध्यात्मासोबतच पर्यावरणासाठी कार्य करत आहेत. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेकच्या संपूर्ण वातावरणात वेगळाचं उत्साह आणि असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

Published on: Jan 11, 2024 11:01 PM