Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

My India My Life Goal | पद्मश्री थिम्मक्का यांचा अभिमान, वयाच्या 112 व्या वर्षीही पर्यावरण रक्षणासाठी लावताय झाडे

My India My Life Goal | पद्मश्री थिम्मक्का यांचा अभिमान, वयाच्या 112 व्या वर्षीही पर्यावरण रक्षणासाठी लावताय झाडे

| Updated on: Aug 07, 2023 | 8:43 PM

वयाची ६५ वर्ष ज्यांनी रोपे लावली आणि ती आपल्या मुलांप्रमाणे वाढवली. आज ११२ व्या वर्षी ही देत आहे पर्यावरण वाचवण्यासाठी प्रेरणा.

बंगळुरू : सालुमरदा तिम्मक्का एक पर्यावरणवादी आणि कन्नडच्या वृक्ष माता आहेत. आपल्या पर्यावरणासाठी त्यांचे योगदान मोठे आणि अद्वितीय आहे. त्या आता 112 वर्षांच्या आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या गेल्या 65 वर्षांपासून रोपटे लावत आहेत आणि त्याची झाडे बनताना पाहत आहेत. आतापर्यंत 8,000 हून अधिक रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन त्यांनी केले. पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या महान योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने 2019 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. या वयातही ते रोपटे लावतात. त्यांचे पती चिकरंगय्या हे देखील तिम्मक्का यांना झाडे लावायला मदत करायचे. या जोडप्याला अपत्यप्राप्ती झाली नाही. ती उणीव त्यांनी रोपटे लावून त्यांचे संगोपन करुन पूर्ण केली. आपल्या निस्वार्थ कार्यातून देशातील तमाम कन्नडिगरांना प्रेरणा देणार्‍या सालुमरदा तिम्मक्का यांना वृक्षमाता म्हणणेच योग्य वाटते.

 

 

Published on: Aug 07, 2023 08:43 PM