मुंबईच्या प्रसिद्ध खेतवाडी गणपती बाप्पाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न, यंदा कसा असणार देखावा?
VIDEO | मुंबईच्या प्रसिद्ध खेतवाडीच्या गणपती बाप्पाचा पाद्यपूजन सोहळा आज संपन्न, यंदा कसा असणार खेतवाडीच्या बाप्पाचा देखावा आणि मंडळाकडून भक्त आणि भाविकांसाठी कोणती खबरदारी घेण्यात येणार?
मुंबई, 15 ऑगस्ट 2023 | मुंबईच्या प्रसिद्ध खेतवाडीच्या गणराय या गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. आज खेतवाडी गणपती बाप्पाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला. या पाद्यपूजन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येत भाविक सहभागी झाले. आजपासून खऱ्या अर्थाने इथे गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी येथे आजपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लायटिंग, डेकोरेशन आणि इतर काम सुरू करण्यात आली आहे. यंदा मंडळातर्फे गरुडचा भव्य दिव्य देखावा साकारला जाणार आहे. अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे. येथे येणाऱ्या बाप्पाच्या सर्व भाविकांसाठी दर्शनाकरता अवश्यक सर्व सोयी सुविधा आणि सुरक्षेच्या बंदोबस्त करण्यात येणार आहे .
Published on: Aug 15, 2023 07:09 PM
Latest Videos