Naresh Mhaske : ‘जे कधीही विमानात बसले नव्हते, त्यांना..’, नरेश म्हस्के यांचं वादग्रस्त विधान
Naresh Mhaske On Pahalgam पहलगामच्या धक्कादायक हल्ल्यात रक्ताची माणसं गमावून राज्यात परतलेल्या पर्यटकांविषयी खासदार नरेश म्हस्के यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
एकीकडे लोक मृत्यू पावून काश्मीरमधून परतले पण दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या बढाया मारणं थांबलेलं नाही. याचा प्रत्यय आज खासदार नरेश म्हस्के यांच्या पहलगाम हल्ल्यावर केलेल्या व्यक्तव्यावरून आला आहे. ‘जे लोक कधीही विमानात बसले नाही, त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानाने आणलं आहे’, असं असंवेदनशील विधान नरेश म्हस्के यांनी आज केलं आहे. रक्ताची माणसं गमावून महाराष्ट्रातले पर्यटक आज राज्यात परतले असताना नरेश म्हस्के यांनी अशाप्रकारे वादग्रस्त विधान केलेलं आहे. पहलगाममध्ये मंगळवारी झालेला अतिरेकी हल्ला हा पुलवामानंतरचा सगळ्यात मोठा हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यात धर्म विचारून दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना निर्घृणपणे गोळ्या घालून मारलं. या सगळ्या परिस्थितीत घाबरलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने मायदेशी परत आणण्यात आलं आहे. त्यावर नरेश म्हस्के हे वादग्रस्त विधान केलं आहे.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा

'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी

मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले

पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
