Pahalgam Attack Updates : पहलगाम हल्ल्यातल्या ‘त्या’ झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
Pahalgam Attack NIA Investigation : पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं. या झिपलाइन ऑपरेटरची चौकशी एनआयएकडून केली जाणार आहे. तसंच सेल्फी व्हिडीओ काढणाऱ्याची देखील चौकशी केली जाणार आहे. या व्हिडिओमध्ये पहलगाम हल्ल्याच्या काही वेळ आधीच हा झिपलाइन ऑपरेटर सातत्याने काही धार्मिक मंत्र पठन करत होता. त्याच वेळी या ठिकाणी अचानक गोळीबार सुरू झालेला या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आता एनआयएने या झिपलाइन ऑपरेटरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तसंच हा व्हिडिओ बनवणारा पर्यटक जो गुजरातचा आहे. त्याची देखील चौकशी केली जाणार आहे.
Published on: Apr 29, 2025 11:50 AM
Latest Videos