Breaking | ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनं पाकिस्तानवर विजय, ऑस्ट्रेलिया टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्य़े
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना तसा कमालीचा चुरशीचा झाला. एखाद्या रोलर कोस्टर राइडप्रमाणे कधी पाकच्या तर कधी ऑस्ट्रेलियाच्या दिशेने झुकणाऱ्या सामन्यात अखेर ऑस्ट्रेलियानेच सरशी केली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 176 धावांपर्यंत मजल मारली होती. जे टार्गेट ऑस्ट्रेलियाने 5 गडी आणि एक ओव्हर राखून पूर्ण केलं आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड हे विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
यंदाच्या विश्वचषकात (T20 World Cup 2021) कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर मात्र शेपूट घातली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात 5 विकेट्सनी पराभूत होत पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेला आहे. तर ऑस्ट्रेलियाने थेट अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचा सामना रविवारी (14 नोव्हेंबर) न्यूझीलंडशी (New zealand vs Australia) होणार आहे.