DCM Eknath Shinde : पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
Lack of coordination in Mahayuti Over Pakistani Citizens : देशातल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा पहलगाम हल्ल्यानंतर रद्द करण्यात आला आहे. सर्व पाकिस्तानींना देशासह राज्यातून बाहेर घालवण्यात येत आहे. यात आता महायुतीत समन्वय नसल्याचं बघायला मिळत आहे.
पाकिस्तानी नागरिकांवरून राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव बघायला मिळत आहे. राज्यातले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे. तर राज्यात आलेला एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही, असंही फडणवीस यांनी म्हंटलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी म्हंटल आहे की पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा. हे फार्मान प्रत्येक भारतीयाच्या मनातलं आहे. आता राज्यातले 107 पाकिस्तानी नागरिक कुठेतरी बेपत्ता आहेत. ते जिथं असतील त्यांनी तिथून पाकिस्तानमध्ये चालतं व्हा..’ असं शिंदे यांनी म्हंटलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं की, ‘राज्यात आलेला एकही पाकिस्तानी हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत, ते सगळे सापडलेले आहेत. सगळ्यांना इथून घालवायची व्यवस्था केलेली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक याठिकाणी राहणार नाही’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा

'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी

मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले

पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
