Special Report | Pakistan मध्ये सत्ता बदल होणार…
मित्रपक्षातील उमेदवारानीच वेगळी चूल मांडल्याने इम्रान खान यांची सत्ता जाणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काही तासातच हे चित्र स्पष्ट होईल असे दिसत आहे.
येत्या काही तासात पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानातील संसदेत असणाऱ्या एकूण सदस्य हे 342 आहेत, आणि पाकिस्तानात बहुमत अथवा सरकार स्थापन करण्यासाठी 172 सदस्यांची गरज लागते. ज्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सत्ता स्थापन केली त्यावेळी त्यांच्या पक्षाचे म्हणजे तहरिक-ए-इन्साफचे 120 सदस्य होते. त्यावेळी मित्रपक्षांकडून 55 उमेदवार घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. काही दिवस सत्तेची खुर्चीचा वाद नव्हता त्यावेळी सगळी सूत्रं इम्रान खान यांच्याकडेच होती. आता मात्र मित्रपक्षातील उमेदवारानीच वेगळी चूल मांडल्याने इम्रान खान यांची सत्ता जाणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काही तासातच हे चित्र स्पष्ट होईल असे दिसत आहे.
Latest Videos