पोलिसाच्या गाडीनं दुचाकीस्वाराला उडवलं, तीन चाकांवर गाडी चालवण्याचा थरार, API वर गुन्हा दाखल
पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये हिट अँड रनचं प्रकरण उघडीकस आलंय. विशेष बाब म्हणजे हे सहायक पोलीस निरीक्षकाच्या गाडीनं एका दुचाकीस्वाराला उडवण्यात आलंय. याशिवाय तीन चाकावर गाडी चालवल्याचा थरार देखील घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितंल आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये हिट अँड रनचं प्रकरण उघडीकस आलंय. विशेष बाब म्हणजे हे सहायक पोलीस निरीक्षकाच्या गाडीनं एका दुचाकीस्वाराला उडवण्यात आलंय. याशिवाय तीन चाकावर गाडी चालवल्याचा थरार देखील घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितंल आहे. पोलिसाच्या गाडीनं दुाचाकीस्वाराला उडवलं असून तीन चाकांवर गाडी चालवण्याचा थरार डहाणूमध्ये पाहायला मिळालं. या घटनेप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आलाय.
नेमकं काय घडलंय?
डहाणू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तारापूर ते डहाणू पोलीस ठाण्यापर्यंत भरधाव गाडी चालवून अपघात करून काहींना जखमी केल्याची घटना समोर आलीय. त्यातील एकाची प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्या व्यक्तीला नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Latest Videos