'श्रीनिवास वनगा टेन्शनमध्येच होते, ते म्हणाले जगून काय फायदा....' पत्नी सुमन वनगा चिंतेत

‘श्रीनिवास वनगा टेन्शनमध्येच होते, ते म्हणाले जगून काय फायदा….’ पत्नी सुमन वनगा चिंतेत

| Updated on: Oct 29, 2024 | 3:03 PM

विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची एकच लगबग सुरू आहे. दरम्यान, पालघरमधून यंदा श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी भाजपमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर श्रीनिवास वनगा हे नाराज असून ते ढसाढसा रडले.

पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे मागील बारा तासांपासून नॉट रिचेबल आहे. आमदार श्रीनिवास वनगा यांचा त्यांच्या कुटुंबीयांसोबत देखील कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. विधासनभा निवडणुकीचं तिकीट शिंदे गट शिवसेनेकडून नाकारल्याने दोन दिवसांपासून आमदार श्रीनिवास वनगा डिप्रेशनमध्ये गेले होते. मागील दोन दिवसांपासून ते सारखं आत्महत्या करणार असल्याचं वक्तव्य करत असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान बारा तासांपासून संपर्क होत नसल्याने आम्ही मोठ्या चिंचेत असल्याचेही पत्नी सुमन वनगा यांनी सांगितलं असून या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री शंभूराजे देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी आमच्याशी संपर्क केला असल्याची माहिती वनगा यांची पत्नी सुमन वनगा यांनी दिली आहे. बघा त्या का म्हणाल्या?

Published on: Oct 29, 2024 03:03 PM