PAN-Aadhaar Linking Deadline : पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
आयकर विभागाने 31 मे पूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. आयकर विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून करदात्यांना याबाबत इशारा दिला आहे.
तुम्ही जर करदाते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयकर विभागाने 31 मे पूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. आयकर विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून करदात्यांना याबाबत इशारा दिला आहे. आयकर नियमांनुसार, जर करदात्याचे पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसेल, तर अशा परिस्थितीत त्याला दुप्पट टीडीएस भरावा लागणार आहे. 24 एप्रिल 2024 रोजी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने म्हटले आहे की, ज्या खात्यांमध्ये 31 मार्च 2024 पर्यंत व्यवहार झाले आहेत त्या खात्यांमध्ये 31 मे 2024 पर्यंत आधार आणि पॅन लिंक केल्यावर जास्त दराने TDS कापला जाणार नाही.
Published on: May 29, 2024 10:59 AM
Latest Videos